Jalsamvad Radio

/Jalsamvad Radio
Jalsamvad Radio 2020-07-23T19:31:32+00:00

(पाणी या विषयाला वाहिलेला तुमचा, आमचा, सर्वांचा वेब रेडियो)

पाणी या विषयाला वाहिलेला, जलसाक्षरतेचा प्रचार आणि प्रसार करणारा एकमात्र रेडियो म्हणून हा रेडियो आपल्या सेवेत रुजू झाला आहे. वेब रेडियो असल्यामुळे हा सर्व जगात ऐकता येतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तुमच्या मोबाइलवर Jalsamvad Radio (जलसंवाद रेडियो) हे अ‍ॅप डाउनलोड केले तर आपणही हा रेडियो सहजपणे ऐकू शकता. सध्या या रेडियोवर खालील मालिका चालू आहेतः

 • प्रश्‍न भूजलाचाः श्री. दिलीप सातभाई, (भूतपूर्व उपसंचालक, जी.एस.डी.ए.)
 • जीवित नदी चळवळः श्रीमती शैलजा देशपांडे (संस्थेच्या कार्यकर्त्या)
 • जगातील प्रसिद्ध धरणांचा परिचय
 • पर्यावरणीय जीवन पद्धतीः डॉ. प्रमोद मोघे (निवृत्त ज्येष्ठ वैज्ञानिक, एन.सी.एल. पुणे)
 • गोष्ट पाण्याचीः डॉ. दत्ता देशकर (संपादक जलसंवाद मासिक)
 • जगातील प्रसिद्ध सरोवरांचा परिचय
 • रोटरी चळवळ आणि पाणीः श्री. सतीश खाडे संचालक, पाणी विभाग, रोटरी जिल्हा ३१३१)
 • जगातील प्रसिद्ध नद्यांचा परिचय
 • पानी तेरा रंग कैसाः डॉ. दत्ता देशकर (संपादक जलसंवाद मासिक)
 • वारसा पाण्याचाः डॉ. दि. मा. मोरे (निवृत्त सचिव, पाटबंधारे विभाग, महाराष्ट्र राज्य)
 • भारतातील प्रसिद्ध नद्यांचा परिचय
 • भारतातील प्रसिद्ध सरोवरांचा परिचय
 • जलक्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींचा व संस्थांचा परिचय
 • महाराष्ट्रातील जलक्षेत्रातील यशोगथा
 • भारतातील प्रसिद्ध धरणांचा परिचय
 • विविध देशांतील पाणी प्रश्‍नांची तोंड ओळख

स्वतः ऐका व इतरांना ऐकाला सांगा. तुम्हीही या रेडियोच्या कार्यक्रमात भाग घेवू शकता. आपल्या मोबाइलवर आपले पाण्याबद्दल विचार मांडा आणि ती ऑडियो क्‍लिप ०९३२५२ ०३१०९ या मोबाईल क्रमांकावर पाठवून द्या.

धन्यवाद.
डॉ. दत्ता देशकर